भारतीय मसाल्यांची एकूणच भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका होती. भारतीय पाककृतीमध्ये मसाल्यांचा वापर हजारो वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. देशाच्या इतिहासाच्या विविध पैलूंवर प्रभाव टाकला तर व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि प्रादेशिक पाककृती परंपरांचा विकास या गोष्टी मसाल्यांच्या बरोबरीने घडलेल्या जाणवतात.
प्राचीन व्यापार
आपला देश हा प्राचीन काळापासून मसाल्यांचा देश म्हणून ओळखला गेला आहे. काळी मिरी, वेलची, दालचिनी, लवंगा आणि हळद यासारख्या मसाल्यांना प्राचीन संस्कृतींमध्ये आणि त्या काळात जगभरातून खूप मागणी होती.
या व्यापाराने केवळ आर्थिक समृद्धीच आणली नाही तर सांस्कृतिक देवाणघेवाण त्या काळात सुलभ केली. जगभरातील विविध पाककृतींच्या विकासावर भारतीय भूभागातील मसाल्यानी प्रभाव टाकला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
वसाहतवाद आणि मसाल्यांचा व्यापार
मसाल्यांचा शोध हा वसाहतीकरणामागील महत्त्वाचा प्रेरक घटक होता असे समजले जाते. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटीश या सर्वांनी भारत आणि जगाच्या इतर भागांमध्ये मसाला उत्पादक प्रदेशांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
मसाल्यांचा व्यापार वसाहती वाढवण्यासाठी सुरुवात म्हणून ठरला. नवीन व्यापार मार्ग तयार करण्यात आणि जागतिक भू-राजनीतीवर प्रभाव पाडण्यात हा मसाला व्यापार महत्त्वाचा होता.
आयुर्वेद आणि औषधी गुणधर्म
मसाल्यांचा वापर खाद्यपदार्थ व्यतिरिक्त त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. मसाल्याना एक प्राचीन परंपरागत औषध प्रणाली समजलं गेलं आहे. आयुर्वेद या वैद्यकशास्त्राने मसाल्यांचे उपचारात्मक मूल्य, पचनशक्ती वाढवण्याची व प्रतिकारशक्ती सुधारण्याची आणि विविध आजारांवर उपचार करण्याची क्षमता ओळखली.
प्रादेशिक पाककला परंपरा
भारतीय पाककृती या वैविध्यपूर्ण तर आहेत. विशिष्ट अशी चव आणि विविध मसाल्यांचे मिश्रण हा भारतीय मुदपाकखान्याचा कणा आहे. उत्तर भारतातला गरम मसाला असो की दक्षिण भारतातली सांबार पावडर किंवा महाराष्ट्रातला गोडा मसाला या गोष्टी भारतीय खाद्यपदार्थांना वैशिष्ठय अशी ओळख देतात.
सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व
मसाल्यांचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वही मान्य केले गेले आहे. धार्मिक समारंभ, उत्सव आणि पारंपारिक विधींमध्ये मसाल्यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, हळद हिंदू विधींमध्ये शुभ मानली जाते आणि विविध प्रसंगी वापरली जाते. केशराचा काही समुदायांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे.
एकुणातच काय तर भारतीय मसाल्यांनी इतिहासात व्यापार, शोध, वसाहतवाद, पाककला परंपरा, वैद्यक आणि सांस्कृतिक पद्धतींवर प्रभाव टाकून बहुआयामी भूमिका बजावली आहे.
– शंतनू खानवेलकर
9890252771
shantanuand@gmail.com