‘हास्य’ जर बघायला गेलं तर हा एक लहानसा जोडाक्षरी शब्द आहे. या लहानशा शब्दांत तुमचे जीवन सुंदर करण्याची क्षमता आहे. म्हणाल तर एक शब्द आहे म्हणाल तर आयुष्य आहे.
जीवनात आनंदी राहणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम असतात दुःख असते आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एवढे व्यस्त होऊन जातो की कधी कधी आपण हसणे विसरून जातो.
तेच जर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम बाजूला सारून एखाद्या विनोद जरी ऐकला तर तुमच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि त्यावेळी पुरते का होईना पण तुम्ही तुमचे प्रॉब्लेम, दुःख विसरून जाता. ही आहे ह्या हास्याची खासियत.
आपण बघा जर एखादी व्यक्ती तणावात (टेन्शन) दिसली की त्या व्यक्तीला म्हणतो, “अरे कशाला टेन्शन घेतो? मस्त आनंदात जगायचे अर्धे प्रॉब्लेम असेच संपून जातील.” पण ह्याच गोष्टीची आपल्या आयुष्यात अंमलबजावणी करायची म्हटलं तर ते आपल्याला जमत नाही.
मग लोक म्हणतील? बोलणं सोपं असतं, करणं अवघड असत, पण ते हे विसरतात की अवघड असेल पण अशक्य नाही. विज्ञान सांगते, आपण जेव्हा हसतो तेव्हा आपल्या शरीरात, मेंदूमध्ये Happy Harmones तयार होतात आणि आपणाला छान वाटतं.
आपलं मन, आपलं शरीर तेव्हा रिलॅक्स होतं आणि आपल्याला एक नवी ऊर्जा मिळते. मग तुम्हीच ठरवा तुम्हाला हसून आपल्या आयुष्याला सुंदर करायचं की दुःखी राहून आयुष्य कठीण, खडतर बनवायचं. निर्णय तुमचा आहे.
– संपतराव जगताप
मो. 9323186819
ई-मेल : sampatrao.jagtap@gmail.com